केंद्र सरकारकडून रासायनिक खतांच्या सबसिडी त भरघोस वाढ

2 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाने खूपच महत्त्वाचे निर्णय घेतले. या बैठकीमध्ये रासायनिक खतांच्या नवीन दराविषयी महत्त्वपूर्ण चर्चा केलेली आहे. त्यासोबतच रासायनिक खतांची जी सबसिडी आहे ही सबसिडी वाढवण्यात आलेली आहे.
आता रब्बी सीजन साठी शेतकऱ्यांना खूपच चांगला फायदा होणार आहे कमी दरामध्ये आपल्याला रासायनिक खते उपलब्ध होऊ शकतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 51 हजार 875 कोटी रुपयांची सबसिडी रासायनिक खतांना देण्यात आलेले आहे , ही सबसिडी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 पासून 31 मार्च 2023 पर्यंतच्या कालावधीसाठी मान्य आहे.
केंद्रीय कॅबिनेट आणि आर्थिक विषयांच्या मंत्रिमंडळीय समितीमध्ये नायट्रोजन तसेच फॉस्फरस व पोटॅश सोबतच बाकीचे न्यूट्रिएंट्स म्हणजेच सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम या खतांचे नवीन दर मंजूर केलेले आहेत.रासायनिक खतांचे नवीन दर व मिळणारी सबसिडी पुढील प्रमाणे:
नायट्रोजन 98.2 रुपये किलो
फॉस्फरस 66.93 रुपये किलो
पोटॅश 23.65 रुपये किलो
सल्फर 6.12 रुपये प्रति किलो

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाच्या बैठकीमध्ये सर्व फॉस्फरस, नायट्रोजन व पोटॅश खतांची नवीन दर उपलब्ध करून व सबसिडी अप्लाय करण्यासाठी विचार केलेला आहे .तर शेतकऱ्यांसाठी या रब्बी सीजन 2022,23 साठी कमी दरामध्ये खते उपलब्ध होणार आहेत, यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये शेती उत्पादन काढण्यास मदत होईल.यामुळे महागाई कमी होण्यास देखील मदत मिळणार आहे .तसेच खतांच्या कंपन्यांना देखील नवीन दरानुसार सबसिडी देण्याची सुविधा ही केलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर याचा फायदा होईल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या केंद्रीय कॅबिनेट व एमसीए या बैठकीमध्ये मिनिस्ट्री ऑफ फर्टीलायझर ने ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. ट्विटमध्ये खत मंत्रालयाने सांगितले आहे की, सरकारने आयात व निर्माण यांच्या आधारावर ही शेतकऱ्यांसाठी स्वस्त व किफायतशीर दरात नायट्रोजन पोटॅश व फॉस्फरस साठी सबसिडी उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे खतांच्या किमती काही दिवसांनी कमी होतील.

Leave a Comment