आता मिळवा आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स Whatsapp वर

नमस्कार मित्रांनो आजच्या युगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने सोपी बनत आहेत. आपल्याला जर कोणतीही कागदपत्रे सहज ऑनलाइन पद्धतीने मिळत आली तर आपले कागदपत्रे मिळवण्यासाठीचे होणारे श्रम खूपच कमी होतील. जर आपण कामानिमित्त बाहेर राहत असाल तर आपल्याला आपली कागदपत्रे मिळवण्यासाठी आपल्या गावी जाण्याची गरज नाही आपण काही सोप्या स्टेप्स मध्ये आपल्याला आवश्यक असणारी कागदपत्रे ओरिजनल स्वरूपात मिळवू शकता.

इंटरनेटवर वेगवेगळ्या वेबसाईटवर फॉर्म भरणे तसेच आपली माहिती देऊन कागदपत्रे मिळवणे खूपच किचकट असते. त्यामुळे बऱ्याच लोकांना ऑनलाईन कागदपत्रे मिळवण्यास अडचणी येतात. जर आपण एक सोपा मार्ग शोधत असाल तर आपल्याला व्हाट्सअप द्वारे अगदी सोप्या पद्धतीने कागदपत्रे मिळवता येतील. या ऑनलाइन सेवेद्वारे आपण आपल्याला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे एकाच क्रमांकावर मेसेज करून मिळवून शकता. जर तुमच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असेल तर तुम्ही माहिती आणि प्रसारण विभागाचे डिजिलॉकर हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून ही सर्व कागदपत्रे डाऊनलोड करू शकता परंतु जर आपल्याला कोणत्याही ॲप वापरता अगदी सहज पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स डाऊनलोड करायचे असतील तर खालील पद्धतीचा अवलंब करा.

जर आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड ची गरज असेल तर तर आपण कोणतीही कागदपत्रे न देता फक्त आपल्या आधार कार्डचा नंबर क्रमांक देऊन आपली सर्व कागदपत्रांची डिजिटल प्रति आपल्या मोबाईल मध्ये मिळवू शकता. ही सेवा भारत सरकार मार्फत दिली जात असल्यामुळे आपल्याला गोपनीयता किंवा कागदपत्रांची सुरक्षितता याबाबत काळजी करण्याची अजिबात गरज नाही. जर आपले डीजी लॉकर या वेबसाईटवर किंवा ॲप वर आधीपासून खाते असेल तर आपण खूप सोप्या पद्धतीने सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात मिळवून शकता ही सर्व कागदपत्रे कशी मिळवायची याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिली जाईल.

या सेवेद्वारे मिळणारी कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • जन्माचा दाखला
 • पासपोर्ट
 • दहावी आणि बारावी परीक्षेचे बोर्ड सर्टिफिकेट
 • जातीचा दाखला
 • इतर महत्वाची कागदपत्रे

आता आपण मुद्देसूदपणे व्हाट्सअप वर कागदपत्रे मिळवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे टप्पे बघूया. आपण हे टप्पे एकानंतर एक याप्रमाणे पूर्ण करा आणि तयार झालेले डॉक्युमेंट्स आपल्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवा.

 1. सर्वात आधी आपल्याला +91 9013151515 हा क्रमांक MyGov Helpline या नावाने सेव्ह करायचा आहे. मित्रानो हा क्रमांक भारत सरकारच्या MyGov या पोर्टलचा संपर्क क्रमांक आहे.
 2. त्यानंतर वर दिलेल्या क्रमांकावर आपल्या whatsapp वरून Hi असा मेसज करायचा आहे. Hi ऐवजी तुम्ही नमस्कार असेही पाठवू शकता.
 3. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, त्यातील DigiLocker Services हा पर्याय नवडायचा आहे.
 4. त्यानंतर तुम्हाला तुमचे Digilocker अकाउंट आहे का असे विचारले जाईल. नवीन अकाउंट बनवण्यासाठी No हा पर्याय निवडा.
 5. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करून पाठवा.
 6. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करून पाठवा.
 7. त्यानंतर नवीन कागदपत्रे मिळवण्यासाठी issue new documents हा पर्याय निवडा
 8. त्यानंतर उपलब्ध पर्यायांपैकी तुम्हाला आवश्यक असलेले कागदपत्र निवडा.
 9. त्यानंतर त्या कागदपत्र बद्दल विचारली जाणारी माहिती उदाहरणार्थ: तुमचा पॅनकार्ड क्रमांक, HSC बैठक क्रमांक प्रविष्ट करा.
 10. त्यानंतर तुम्हाला तुमचे आवश्यक कागदपत्र बघायला मिळेल. हे कागदपत्र तुम्ही pdf स्वरूपात डाऊनलोड देखील करू शकता.

DigiLocker द्वारे मिळालेली सर्व कागदपत्रे कायदेशीररित्या वैध आहेत. ही कागदपत्रे तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकता. जर तुम्ही कुठेही वाहन चालवत असाल आणि तुमच्याकडे वाहन ड्रायव्हिंग परवाना घरी राहिला असेल तर तुम्ही Whatsapp वरील ही DigiLocker ची सुविधा वापरून परवाना डिजिटल स्वरूपात मिळवू शकता. हा मोबाईल वरील परवाना पोलिसांना दाखवून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करा.

तसेच इतर कायदेशीर आणि शैक्षणिक कामासाठी या व्हॉट्सॲप वरील सुविधेचा वापर करू शकता.

2 thoughts on “आता मिळवा आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स Whatsapp वर”

Leave a Comment